बंदी असूनही दारूविक्री खुलेआम
By Admin | Updated: August 17, 2015 02:47 IST2015-08-17T02:47:29+5:302015-08-17T02:47:29+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत वाघेश्वर मंदिरात आयोजित मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामसभेत गावात दारूबंदी असताना खुलेआम

बंदी असूनही दारूविक्री खुलेआम
मांडवगण फराटा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत वाघेश्वर मंदिरात आयोजित मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामसभेत गावात दारूबंदी असताना खुलेआम दारूविक्री होते, यावर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लतिकाताई जगताप होत्या.
मांडवगण फराटा येथील अधिकृत बिअरबार ७ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सीमाताई फराटे व विद्यमान सरपंच लतिकाताई जगताप या दोघींच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येऊन उभी बाटली आडवी करून अधिकृत बिअर बार बंद करुन त्याची प्रत्यक्षात शासनदरबारी नोंद झाली आहे. एवढे प्रयत्न करूनही गावात अनेक ठिकाणी खुलेआम दारू विक्री चालू आहे. ग्रामसभेमध्ये दादासाहेब फराटे, अंकुश जगताप, गोरक्ष शितोळे, गणपत फराटे, हानु फराटे, योगेश फराटे, संतोष नागवडे, पांडुरंग फराटे, विशाल फराटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.
या वेळी ‘घोडगंगा’चे माजी संचालक आत्माराम फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ शितोळे, घोडगंगाचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, गणपतराव फराटे, संचालक जगन्नाथ जगताप, सुधीर फराटे, सरपंच लतिकाताई जगताप, उपसरपंच महादेव फराटे, पोलीसपाटील बाबा पाटील फराटे, सीताराम वराळे, फक्कडराव शितोळे, माजी उपसरपंच दीपक पाटील फराटे, संजय फराटे, ग्रा. पं. सदस्य अशोक फराटे, जगन्नाथ जगताप, पंडितराव फराटे, अशोक जगताप, अमोल जगताप, सचिन शितोळे, मंगलताई राजगुरू, शोभाताई वेदपाठक, अलका भडांगे, बिभीषण फराटे, संजय जगताप, अण्णा फराटे, माऊली फराट, किशोर फराटे, राजेंद्र कांबळे, सहायक फौजदार विठ्ठल लडकत मोठ्या संख्येने ग्रामस्थं उपस्थित होते. (वार्ताहर)