ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात उपनगराध्यक्षाचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:06+5:302020-12-04T04:30:06+5:30
दरम्यान प्रभाग क्र. ७ आणि ८ मधील स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष वसीम शेख, नगरसेविका कांचन साळवे, नगरसेवक गौतम साळवे ...

ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात उपनगराध्यक्षाचा उपोषणाचा इशारा
दरम्यान प्रभाग क्र. ७ आणि ८ मधील स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष वसीम शेख, नगरसेविका कांचन साळवे, नगरसेवक गौतम साळवे यांच्यासह या प्रभागातील काही नागरिक धरणे आंदोलन करणार आहेत.
दौंड नगरपरिषद हददीतील प्रभाग क. ७ व ८ मधील गिरीराज अपार्टमेंट ते उत्सव अपार्टमेंट रस्ता काँकेटी करणे या कामाच्या ठेकेदारास गेल्या २ ते ३ वषार्पासुन वारंवार कामाची मुदतवाढ देवून सुध्दा काम खुप संथगतीने तसेच निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. वारंवार या कामासंदर्भात पाठपुरावा नगरपालिका प्रशासनाकडे केला असता. दौंड नगरपालिका प्रशासन देखील सदर ठेकेदाराकडे कानाडोळा करीत असून ठेकेदाराला पाठिशी घालत आहे. जनतेच्या हितासाठी असमाधानकारक उत्तर देत आहे. एकंदरीतच ठेकेदारांनी दौंड शहरातील महत्वाचे रस्ते रखडत ठेवलेले आहेत.
चौकट
शालीमार चौक ते स्वामी समर्थ परिसर हा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरील काम खोळंबल्यामुळे मोठी वाहने ये जा करणे गेली दोन वर्र्षापासून बंद झाले आहे. तर दुचाकी वाहन चालकांना तीन ते चार कि.मी अंतराचा वळसा घालून ये जा करावी लागते. या रस्त्यावरील सर्वच दुकानदारांचा व्यावसाय ठप्प झाला असून व्यापारी हैराण झाले आहेत. याला जबाबदार संबंधित ठेकेदार आणि नगर परिषद प्रशासन आहे.
- वसीम शेख
उपनगराध्यक्ष, दौंड
फोटो ओळ : दौंड शहरातील शालीमार चौक ते वनविभाग कार्यालय परिसरातील रस्ता.
03१२२0२0-दौंड-१५