शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या उपमहापाैरांना फ्रान्समध्ये सुखद अनुभव ; फ्रान्सच्या यंत्रणेला केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:45 IST

पुण्याचे उपमहपाैर सिध्दार्थ धेंडे सध्या फ्रान्समध्ये असून तेथील एका रेल्वे स्टेशनवर त्यांना एक सुखद अनुभव आला आहे.

पुणे : पुण्याचे उपमहपाैर सध्या फ्रान्समध्ये कुटुंबियांसह गेले आहेत. तेथे एका रेल्वे स्थानकावर त्यांना सुखद अनुभव आला. त्याचे वर्णन त्यांनी साेशल मीडियावर केले आहे. फ्रान्सच्या यंत्रणेचे मनापासून आभार मानून त्यांनी त्यांना सलाम केला आहे.

पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे सध्या कुटुंबीयांसाेबत फ्रान्समध्ये आहेत. तेथील टाेवलुस या शहरातील रेल्वे स्थानकावर त्यांना सुखद अनुभव आला. याबाबत त्यांनी एक फेसबुक पाेस्ट लिहीत फ्रान्सच्या यंत्रणेला सलाम केला आहे. धेंडे यांनी फेसबुक पाेस्टमध्ये लिहीलं आहे की, लुडस या शहरातून रेल्वेने टाेवलुस या शहराकडे आलाे. तेथून एक प्लॅटफाॅर्म बदलून दुसऱ्या प्लॅटफाॅर्मला जावून दुसऱ्या रेल्वेने लियान शहराकडे जायचे हाेते. आम्ही पाच लाेक हाेताे. त्यातील एका महिलेला चालता येत नव्हते.  त्यामुळे त्या व्हीलचेअरवर हाेत्या. टाेवलुस रेल्वे स्टेशनवर लिफ्टची व्यवस्था दूर हाेती, त्यामुळे दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाईपर्यंत आमची ट्रेन निघून गेली. आम्हाला पुढचा प्रवास करता येणे शक्य नव्हते. आम्ही सर्व हताश झालाे हाेताे. काय करावे ते सुचत नव्हते. देश, भाषा सर्वच अनाेळखी. 

त्यावेळी आमची ही अवस्था पाहून प्लॅटफाॅर्मवर उपस्थित असलेले रेल्वे कर्मचारी आमच्याजवळ आले व त्यांनी आमची विचारपुस केली. आमची कहाणी ऐकल्यावर आम्हाला धीर दिला आणि मदत केंद्राजवळ घेऊन गेले. तेथे आम्हाला तीन तास नंतरच्या ट्रेनचे बुकिंग करुन दिले. तसेच पुढील स्टेशनवर आमची राहायची तसेच जेवणाची व्यवस्था करुन दिली. या सर्व अनुभवनातून हा देश खरच का प्रगत आहे याची जाणीव झाली. नुसता भाैतिक विकास महत्त्वाचा नसून प्रत्येक व्यक्तिच्या मदतीकरीता यंत्रणा देखील विकसीत करणे आवश्यक आहे. अशी यंत्रणा येथे विकसित करण्यात आली असून ती सक्षमपणे कार्यांवित आहे, हे सत्य आहे. 

पुढील प्रवासात आम्हाला एक पैसे ही अधिकचा खर्च करावा लागला नाही. पुढचे रेल्वेचे टिकीट, टॅक्सी, जेवण, हाॅटेलचा खर्च सर्व रेल्वे प्रशासनाने केला. तसेच त्यांचे कर्मचारी आम्हाला साेडायला शेवटपर्यंत आले. मी व माझे कुटुंबिय फ्रांन्स रेल्वेच्या मदत करणाऱ्या सर्व यंत्रणा तसेच आम्हाला सहकार्य करणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताे व त्यांना सलाम करताे. 

टॅग्स :PuneपुणेFranceफ्रान्सrailwayरेल्वे