शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:19 IST

उत्पन्नापेक्षा ३१ टक्के अधिक मालमत्ता, कोण आहेत विजय लांडगे?...

पुणे :पुणे महापालिकेचे उपायुक्त विजय लांडगे यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १ कोटी रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महापालिका उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९, रा. ठाणगाव ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. विजय लांडगे हे सध्या ते महापालिकेच्या तांत्रिक विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

विजय लांडगे याच्याविषयी गोपनीय चौकशी झाल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी उघड चौकशीची परवानगी देण्यात आली होती. विजय लांडगे हे २४ फेब्रुवारी २००० रोजी पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाले होते. तेव्हापासून १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील त्यांच्या एकूण उत्पन्नाची मोजदाद करण्यात आली. त्यात त्यांचे एकूण उत्पन्न ३ कोटी २४ लाख ७९ हजार ४१२ रुपये इतके होते. त्या कालावधीत त्यांची एकूण मालमत्ता ४ कोटी २७ लाख ४० हजार ४०५ रुपये इतकी आढळून आली. हे पहाता १ कोटी २ लाख ६० हजार ९९३ रुपये (एकूण मालमत्तेच्या ३१.५९ टक्के) अधिक मालमत्ता आढळून आली आहे.

विजय लांडगे व त्यांच्या कुटुंबियांचे नावे पुणे शहरात ४ ठिकाणी व नाशिक जिल्ह्यामध्ये १ अशा ५ ठिकाणी मालमत्ता मिळून आल्या असून त्यांचे राहते घराची व या ठिकाणांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती सुरु आहे.

कनिष्ठ अभियंता ते उपायुक्तविजय लांडगे हे २००० मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. पहिली नेमणूक पथ विभागात झाली. २००३ मध्ये पथ विभागातन पाणी पुरवठा विभागात झाली. त्यानंतर त्याच वर्षी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, त्यानतर २००४ मध्ये पुन्हा पथ विभागात बदली झाली. यानंतर २००७ मध्ये वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, २००९ मध्ये घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, २४ मे २०१० रोजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात बढती, २०१३ मध्ये सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात बदली. २०१६ मध्ये येरवडा कार्यालयात बदली, मार्च २०२१ मध्ये उपायुक्त म्हणून बढती होऊन आकाश चिन्ह परवाना विभागात कार्यरत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग