शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या प्रत्युत्तरांवर उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा! पुण्याच्या प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीला केले होते निमंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:49 IST

मोहोळ यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली होती.

ठळक मुद्देबैठकीच्या दिवशी महापौर मुळशी तालुक्यातील गावी आई - वडिलांसमवेत होते. बैठकीला त्यांना निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच त्यांनी गावाला जाण्याचे नियोजन केलं

पुणे: पुणे शहरतील विविध प्रश्नांवर २९ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. मात्र या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रणच नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि महापौर यांच्यात खडाजंगीही झाली होती. मोहोळ यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली होती.

त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ''पुण्याबाबतच्या बैठकीला पुण्याच्या महापौरांना निमंत्रित केलं होतं. मी पण एक पुणेकर आहे. माझ्याकडून पुणेकरांचा अपमान होईल असं होणार नाही'' मी त्यांना बोलावले होते पण ते का आले नाहीत? हे आम्हाला माहित नाही. असा प्रकारचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

बैठकीला गैरहजर राहण्यावरून महापौर मुरलीधर यांनी एकलागोपाठ एक ट्विट करत दिली होती उत्तरे 

दरम्यान बैठकीला गैरहजर राहण्यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकलागोपाठ एक असं करत अनेक ट्विट केले होते.  “राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिल होत आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. तसेच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय २०१७ साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकारुन लावले.” अशी टीका त्यांनी केली होती. 

महापौर होते आई-वडिलांसमवेत मुळशीला 

बैठकीच्या दिवशी महापौर मुळशी तालुक्यातील गावी आई-वडिलांसमवेत होते. बैठकीला त्यांना निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच त्यांनी गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असा सवालही मोहोळ उपस्थित केला होता. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका