साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा इंदापुर दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 08:26 PM2021-02-03T20:26:52+5:302021-02-03T20:27:05+5:30

इंदापुर तालुक्यात बँकेसाठी  सोसायटी मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातच लढत होणार आहे.

Deputy CM Ajit Pawar's visit to Indapur on the backdrop of sugar factory elections |  साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा इंदापुर दौरा

 साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा इंदापुर दौरा

Next

कळस: सहकारी संस्थाच्या निवडणुकीवरील स्थगीती उठल्याने आगामी काही महिन्यात होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व  साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या  निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इंदापुर येथील शनिवार (दि ६)रोजी होणारा शेतकरी मेळावा महत्वाचा मानला जात आहे.

इंदापुर तालुक्यात बँकेसाठी  सोसायटी मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातच लढत होणार आहे. तसेच रास्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कर्मयोगी साखर कारखान्याच्या निवडणुकीची भुमिका या वेळी स्पस्ट होणार आहे.  तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये गेली २० वर्षांपासून निवडणुकीत संघर्ष कायम घुमसत राहीला आहे पाटील यांनी काँग्रेस मधुन बाहेर पडून भाजप प्रवेश केल्यानंतर हा वाद विकोपाला गेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर तालुका गटात पाटील यांचे २००३ पर्यंत वर्चस्व अबाधित होते यामाध्यमातून ४० वर्षांची घोलप गटाची तालुक्यात एकहाती सत्ता होती.

कै.राजेंद्र घोलप  यांनी बँकेचे संचालक व अध्यक्ष पद प्रदीर्घकाळ भूषविले त्याचे चिरंजीव अविनाश घोलप यांची ९५ साली बँकेवर तालुका गटातुन बिनविरोध निवड झाली मात्र याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले समर्थक दत्तात्रेय भरणे यांनाही ओबीसी प्रवर्गातून बँकेवर विराजमान केले यामध्ये तालुक्यातुन दोन सदस्य बँकेवर गेल्यानंतर विचारभिन्नता असल्याने एकमेकांना कायम विरोध राहीला २००१ साली झालेल्या बाजार समिती निवडणुकीनंतर माजी मंत्री पाटील व दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे यांच्यात मतभेद झाल्याने माने व जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व २००२ साली झालेल्या जिल्हा बँकेचे निवडणूकीत पाटील समर्थक अविनाश घोलप यांना आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यूह रणनीती आखुन पराभुत केले व घोलप गटाची सत्ता संपुष्टात आणली.

मात्र निवडणूक झाल्यानंतर जगदाळे यांनी पुन्हा घरवापसी करत २००४ साली पाटील यांना विधानसभा निवडणुकीत सहकार्य केले त्यामुळे २००८ साली जिल्हा बँकेचे निवडणूकीत तालुका गटातुन घोलप का जगदाळे कोणाला समर्थन करायचे हा पेच पाटील यांच्या समोर उभा राहिला यावेळी पाटील यांनी जगदाळे यांना समर्थन दिले त्यामुळे घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली व पुन्हा जगदाळे व घोलप यांच्यात लढत झाली मात्र यामध्येही घोलप यांना पराभूत व्हावे लागले मात्र घोलप यांचे छत्रपती सहकारी कारखान्याचे अध्यक्षपद देवुन रास्ट्रवादी काँग्रसने पुनर्वसन केले.

यादरम्यान जगदाळे यांनीही पुन्हा काही कालावधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला २००९ ला भरणे यांना आमदारकी साठी सहकार्य केले  मात्र नंतर २०१५ साली झालेल्या बँकेच्या निवडणूकीत पाटील समर्थक कै रमेश जाधव यांनी माघार घेतल्याने जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली मात्र २०१९ साली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरणे व जगदाळे यांच्यात आमदारकी लढविण्यावरुन मतभेद निर्माण झाल्याने जगदाळे यांनी समर्थकांसह भाजपवाशी हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते पुन्हा बिघडली आहेत त्यामुळे आगामी महिन्यात होणार्‍या बँकेच्या निवडणुकीसाठी व कारखाना निवडणुकीसाठी राज्यमंत्री भरणे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे हा संघर्ष कायम घुमसत रहाणार आहे.

कर्मयोगीवर पाटलांचे निर्विवाद वर्चस्व ...
 

कै शंकरराव पाटील यांनी  वालचंदनगर येथील खासगी कारखाना विकत घेऊन बिजवडी येथील माळरानावर ३५ वर्षापूर्वी हा कारखाना सुरू केला अर्थिक स्थिती चांगली असलेला हा कारखाना  काहीसा अडचणीत आहे कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे पतित पावन संघटनेत असताना प्रदिप गारटकर यांनी १९९४ व ९९ ला पॅनल तयार करून आव्हान दिले व २००५ व १० ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिग्गज नेते मंडळी उभी राहिली मात्र माजी मंत्री पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली २०१५ च्या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होवुन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडुन जाण्यासाठी जिल्हातील सर्वच मंत्री व आमदार इच्छुक असतात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम थोपटे, यांनी गेली तिस वर्षात कधीही बँक सोडली नाही त्यामुळे जिल्हा मतदारसंघातुन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तालुका गटातुन भरणे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना मैत्रीखातर पक्षात घेवुन बाय देतात का प्रखर विरोध करुन विरोधात पुन्हा घोलप किंवा प्रविण माने यांना जगदाळे यांच्या विरोधात उभी करतात हे स्पष्ट होईल.

Web Title: Deputy CM Ajit Pawar's visit to Indapur on the backdrop of sugar factory elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.