शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

देहू येथे अजित पवार भाषणापासून 'वंचित', PM मोदीही म्हणाले 'दादांना बोलू द्या'; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 22:06 IST

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैष्णव संवाद सभेच्या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेमकं काय घडलं -कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर, सूत्रसंचालकाने भाषणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. यावर लगेचच, 'अजित दादांना बोलू द्या', असा इशारा पंतप्रधान मोदींनी सूत्रसंचालकाला केला. पण यावेळी अजित दादांनीही 'आपण बोला', असे म्हणत मोदींना खुणावले. अखेर, सूत्रसंचालकाने बोलण्यासाठी नाव घेतल्याने आणि अजित दादांनीही बोलण्याची विनंती केल्याने मोदी भाषणासाठी डायसकडे गेले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही व्यासपीठावर उपस्थित होते.

शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला यायला मिळणे हे माझे भाग्य -तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचे केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला यायला मिळणे हे माझे भाग्य आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका -मोदी म्हणाले, जो भंग होत नाही, तो अभंग. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. संताची उर्जा समजाला गती देण्याचे काम करते. तसेच देशभक्तीसाठी तुकोबांचे अभंग महत्त्वाचे आहेत.

अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे “मिनिट टू मिनिट कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी माहिती पाठवली होती. परंतु त्यांची विनंती मान्य झाली नाही. त्यांना बोलू न देणे हे दुर्देव आहे. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. एवढेच नाही तर, "विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करू देता पण आमच्या नेत्यांना करू देत नाही, ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस