शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्यास उपमुख्यमंत्री अनुकुल; भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:01 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपावर ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देभाजपाकडून सोमवारी मुख्यसभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन मुख्य सभा आता  ‘ऑफलाईन’ अर्थात प्रत्यक्ष होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्षात सभा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अनुकुल असून याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली. 

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ हळूहळू शिथिल करण्यात आले असून दुकानांपासून सिनेमागृहांपर्यंत सर्वकाही सुरु करण्यात आले आहे. त्यातच राज्य आणि केंद्राची अधिवेशनेही झाली आहेत. त्यामुळे पालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्याबाबत सर्व नगरसेवक आग्रही आहेत. मागील काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या मागणीवरुन महापौरांकडून राज्य शासनाकडे पत्र पाठवित मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्याबाबतची मागणी करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाकडून ही परवानगी देण्यात आलेली नाही. 

शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार पुण्यामध्ये आलेले होते. यावेळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पवार यांच्याकडे पालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार हे उपस्थित होते. या मागणीचा सकारात्मक विचार करून पवार यांनी २०० लोकांचा परवानगी सह पालिका सभागृहात प्रत्यक्षात मुख्य सभा घेण्यास परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच, याबाबत मुंबईतील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले असे धुमाळ म्हणाल्या. ====भाजपाकडून सोमवारी मुख्यसभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपावर ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यसभा प्रत्यक्षात घेण्याची परवानगी मिळवून भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे धुमाळ म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा