शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

केंद्राकडून लस मागवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच संपला लसीचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 19:12 IST

लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना अचानक संपली लस. अनेकांवर लसीकरणासाठी येऊन माघारी जायची आली वेळ.

ठळक मुद्देवाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामती शहर आणि तालुका चिंतेत

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सरसकट लसीकरण करता यावा म्हणून केंद्राकडे मागणी करण्याची चर्चा करत आहेत. पण त्याच वेळी बारामती मध्ये मात्र लसीकरण ठप्प झालंय. लस संपल्याचे सांगत बारामती मधल्या अनेक नागरिकांना आज लसीकरण केंद्रावरून परत पाठवण्यात आले आहे. .उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरात कोरोना लसीचा शासकीय साठा संपल्याचे समोर आले आहे. याबाबत अनाभिज्ञ असलेले अनेक नागरिक शनिवारी लसीकरणासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात गेले होते. त्यांना लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लसीकरण ना करताच परत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

बारामती शहरातील एमआयडीसीतील महिला रुग्णालयात कोरोना योद्धांसह नावनोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन कामगार यांचे मोफत लसीकरण १६ जानेवारीपासून  सुरु आहे. तर १ मार्च पासून ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना आज लस संपल्याचे अचानक सांगण्यात आले. बारामतीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच  भर उन्हात लसीकरणासाठी गेलेल्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लस संपली असून सायंकाळपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण लसीकरण मोहीम प्रगतीपथावर असताना लसीचा साठा संपला कसाकाय असा सवाल उपस्थित होत आहे. 

दरम्यान, बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाची आकडेवारी वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यापुर्वी कोरोनाचा येथील आलेख घसरला होता. बारामतीकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचे चित्र होते.मात्र, आता चित्र बदलले आहे. १ ते १२ मार्च दरम्यान बारामतीत ६८२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी मध्ये १० ते १५ रुग्णांवर घुटमळणारी कोरोना रुग्णांची संख्या आता सरासरी प्रतिदिन ६० रुग्णांवर गेली आहे. गेल्या १२ दिवसांत ९ मार्च रोजी सर्वाधिक ८० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामती शहर आणि तालुक्यात चिंता वाढत आहे. आता कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील  कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील ४५ आणि ग्रामीणतधील २३ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच आज  ६८ उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ७४७३ वर पोहोचली आहे. तर ६७५१ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४८ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार