शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरा देवी मंदिरातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:19 IST

धर्मादाय सहआयुक्तांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश

लोणावळा : कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या मंदिरात सुरू असलेला भ्रष्टाचार, दमदाटी व दहशतीने देणगीच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. ही अफरातफर व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून विश्वस्त संजय गोविलकर यांच्यासह दोषींवर तातडीने कारवाई करावी. तसेच, या चौकशीचा अहवाल मुख्यालयास सादर करावा, असा आदेश पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त, यांनी नुकतेच दिले.एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी याबाबत मुख्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत १ आॅगस्टला हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करीत भाविकांच्या देणगी पैशांवर डल्ला मारणाऱ्या लाभार्थी विश्वस्तांवर कडक कारवाई करावी. अन्यथा भाविकांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले, ‘‘ देवस्थानचे लाभार्थी विश्वस्त व पुजारी असलेले संजय गोविलकर यांनी मंदिरात भाविकांची लूट सुरू केली असून, मनमानीपणे भाविकांचे देणगी पैसे व मनिआॅर्डरचे पैसे बॅँकेत जमा न करता परस्पर स्वत:कडे ठेवले जात आहेत. अभिषेकाला येणाºया भाविकांचे पैसे घेतले जातात. मात्र त्यांना पावती न देता पैसे लाटले जात आहेत. देवीला भक्तिभावाने वाहिलेला दागिना हडप केला जात आहे. गोविलकर यांनी याकरिता देवस्थानाच्या व्यवस्थापकांना विश्वस्तांची मीटिंग न घेता धाक दडपशाहीने कामावरून कमी करत देवस्थानामधून पूर्वी कमी केलेल्या लोकांना कामावर घेत भ्रष्टाचार माजविला आहे.’’ एकवीरा देवीच्या मंदिरात मनमानी कारभार करत पैशाची अफरातफर व भ्रष्टाचार करणाºया चार विश्वस्तांवर जुलै महिन्यात निलंबनाची कारवाई करत तसा अहवाल पुणे सहायक धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. लाभार्थी विश्वस्त संजय गोविलकर, विजय देशमुख, काळूराम देशमुख, पार्वतीबाई पडवळ यांचा यामध्ये समावेश आहे. असे असतानादेखील ही मंडळी मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.लाभार्थी विश्वस्तांना पदावरून कमी करा असा आदेश धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी नुकताच पारित केला आहे. त्यानुसार घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती तरे यांनी दिली.आंदोलनाचा इशारा....मंदिरात काही लाभार्थी विश्वस्तांनी बाजार मांडला असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व पैशांची अफरातफर सुरू केली आहे. भाविकांच्या पैशांची सुरू असलेली ही लूट तातडीने न थांबल्यास भाविकांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, जयेंद्र खुणे, विद्या म्हात्रे आदींनी दिला आहे. या वेळी देवस्थानाचे उपाध्यक्ष मदन भोई, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, मधू भोईर, अरविंद भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते.

टॅग्स :lonavalaलोणावळाPuneपुणे