मतदारांमध्ये उदासीनता; 47़69 टक्के मतदान
By Admin | Updated: June 29, 2014 22:53 IST2014-06-29T22:53:47+5:302014-06-29T22:53:47+5:30
महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 56 ब च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) अवघे 47.69 टक्के मतदान झाले. यावरून मतदारांमध्ये उदासीनता दिसली.

मतदारांमध्ये उदासीनता; 47़69 टक्के मतदान
>पुणो : महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 56 ब च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) अवघे 47.69 टक्के मतदान झाले. यावरून मतदारांमध्ये उदासीनता दिसली. किरकोळ वाद वगळता 8 केंद्रांवरील 34 बूथमध्ये हे मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुकांत गरड यांनी दिली. या निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात असून, प्रमुख लढत
मनसे आणि महायुतीच्या
उमेदवार मानली जात आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवारी) सकाळी गणोश कला क्रीडा मंच येथे होणार असून, 9 वाजेर्पयत निकाल लागेल, असे गरड म्हणाले.
बनावट जन्मदाखल्याप्रकरणी मार्च 2क्12च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या प्रभाग 56 ब च्या नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. आज यासाठीचे मतदान पार पडले. त्यात मनसेने पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रिया गदादे, शिवसेनेकडून वैशाली दारवडकर, काँग्रेसकडून, अनिता वाळूंजकर, भारिप बहुजन महासंघाकडून सरस्वती गायकवाड तर अपक्ष उमेदवार म्हणून वनिता देशमुख अशा पाच उमेदवारांमध्ये ही लढत होणार होती. (प्रतिनिधी)
4या प्रभागातील 8 केंद्रांमधील 34 बूथवर हे मतदान झाले. त्यासाठी सुमारे 32 हजार 66 मतदार होते. त्यातील केवळ त्यातील 15 हजार 291 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 8 हजार 26क् पुरुष तर 7क्31 स्त्री मतदारांचा समावेश होता. सकाळी मतदानाची सुरुवात होताच चांगली गर्दी असल्याचे दिसून आले. मात्र, दुपारनंतर मतदानाचा जोर ओसरला़ सायंकाळी साडेतीनर्पयत केवळ 37 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही तासांत 1क् टक्क्यांनी वाढले.