शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

बोनस अन् सातव्या वेतन आयोगासाठी मोडाव्या लागतील ठेवी; महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 20:43 IST

अवघे १२० कोटीच शिल्लक

पुणे: महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आणि सातवा वेतन आयोग द्यायचा असल्यास ठेवी मोडाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असून अवघे १२०कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे वेतन आणि अन्य खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाला बसला आहे. साडेसात हजार कोटींचे अंदाज पत्रक मांडण्यात आले खरे परंतु, हा आकडा पालिका गाठणार का असा प्रश्न आहे. गेल्या सहा महिन्यात पालिकेला मिळकत कर आणि अन्य माध्यमातून १ हजार ९२० कोटींचे उत्पन्न मिळाले असून राज्य सरकारकडून एलबीटी आणि जीएसटीचे ९४४ कोटी उत्पन्न मिळाले आहे. वर्षभरासाठी स्थायी समितीने एलबीटी आणि जीएसटीचे २०७७ कोटीें उत्पन्न अपेक्षित धरले आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नसल्याने यापुढील अनुदानावर त्याचा परिणाम होणार आहे.

पालिकेने मिळकत करामधून २ हजार ३२० कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न धरले असले तरी अद्याप केवळ ३० टक्केच उत्पन्न मिळू शकले आहे. बांधकाम शुल्क परवानगीमधून अपेक्षित असलेल्या ८९१ कोटींपैकी ७० कोटी रुपयेच मिळाले आहेत. तर, अनुदानापोटी ५२ कोटी मिळाले आहेत.  तर पाणीपट्टीचे २०० कोटींचे उद्दीष्ट असतानाही केवळ ५० कोटी रुपयांचे उत्तन्न पहिल्या सहामाहित मिळाले आहे. पालिकेला अधिकारी-कर्मचारी वेतनावर १०० कोटी खर्च करावे लागत आहेत. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा पालिकेवर आर्थिक बोजा पडला आहे. आत्तापर्यंत पालिकेचा एकूण १ हजार ८०५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये १ हजार १८० कोटी हा महसुली खर्च आहे. तर भांडवली खर्च ६२० कोटी रुपये आहे. पालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या 'स' यादीतील ४० टक्के कामे करण्यास परवानगी दिली असली तरी त्याकरिताही निधी उपलब्ध होईल की नाही हा प्रश्न आहे. 

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पालिकेकडे आद्य अवघे १२० कोटी रुपये शिल्लक आहेत. उत्पन्न वाढीसाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

एकूण      अंदाज     प्रत्यक्ष  उत्पन्न

जीएसटी/एलबीटी 2,076   944

मिळकतकर       2,329    750

बांधकाम         981      70

पाणीपट्टी 262         50

अनुदान 194     52 

टॅग्स :Puneपुणे