सहकार निबंधक कार्यालयात ठेवीदारांचा प्रशासनाला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:11+5:302021-06-09T04:13:11+5:30
वाकी येथील गावची पतसंस्था म्हणून जवळपास शंभरहून अधिक ठेवीदारांनी ६ कोटी ३५ लाखांच्या काही वर्षांच्या मुदतीवर लाखांहून अधिक ...

सहकार निबंधक कार्यालयात ठेवीदारांचा प्रशासनाला घेराव
वाकी येथील गावची पतसंस्था म्हणून जवळपास शंभरहून अधिक ठेवीदारांनी ६ कोटी ३५ लाखांच्या काही वर्षांच्या मुदतीवर लाखांहून अधिक रकमेच्या मुदत ठेवी ठेवल्या असताना २६० कर्जदारांना साडेसहा कोटींचे कर्जाचे वाटप करण्यात आले. मात्र, गेले दोन वर्षे कोरोनामुळे कर्जवसुलीला मर्यादा आल्याचे सांगण्यात येत असले तरी, मुळात ठेव पावत्यांची मुदत २०१४-१५-१६-१७ सालातील असेल तर, कोरोनाचा काळ नसल्याचे दिसून येते. यावरून चार-पाच वर्षांपूर्वी मुदत संपूनही पतसंस्थेला ठेवीदारांच्या ठेवी परत देता आल्या नसल्याचे दिसून येत आहे.
दोन गटांच्या वादात मात्र गावातील ठेवीदारांना गावातीलच कर्जदारांनी थकवल्याचे समोर जरी आले तरी शासकीय ऑडिट करताना ही बाब कशी सुटली. पतसंस्थेला ‘अ’ दर्जा देणारे अधिकारी तेवढेच बेजबाबदारपणे वागून ठेवीदारांच्या रकमेंच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या शासकीय ऑडिटर करणाऱ्यांमुळे संचालकांना आणि पतसंस्थेच्या प्रशासनाला पाठीशी घातल्याचे यावरून समोर आले.
तर पतसंस्थेच्या लिपिकाचा घोटाळा त्या काळातील संस्थाचालकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. संतप्त ठेवीदारांनी याबाबत पतसंस्थेच्या कारभाराबाबत फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेत संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या. मात्र, दरवर्षी संस्थेचे ऑडिट करून घेणारे सहकार निबंधक कार्यालयाने एवढ्या प्रमाणात ठेवीदारांची रक्कम अडकून पडली असताना बघ्याची भूमिका घेतल्याचे पहावयास मिळत आहे.
कर्जदारांना १०१ ची नोटीस बजावण्यात आली असून, संबधित कर्जदारांच्या संपती जप्त करून लिलाव करण्याबाबत सहकार कायद्यानुसार कार्यवाही सुरू असून, या पतसंस्थेवर वसुली अधिकारी कोरोनाबाधित झाल्यामुळे ही कारवाई खंडित झाली होती. वसुली अधिकारी कोरोनामुक्त झाल्याने लवकरच कार्यवाही सुरू होईल.
-हर्षित काबंळे, सहायक निबंधक, खेड
..
राजगुरूनगर येथे सहायक निबंधक कार्यालय येथे जमलेले ठेवीदार.