‘निर्मलग्राम’चा बोजवारा

By Admin | Updated: September 2, 2015 03:58 IST2015-09-02T03:58:04+5:302015-09-02T03:58:04+5:30

बारामती तालुक्यातील ४८ आणि इंदापूर तालुक्यातील १५ गावांनी निर्मलग्रामचे पुरस्कार मिळविले आहेत. नवीन सरकार आल्यापासून स्वच्छ भारत

Depletion of 'Nirmalgram' | ‘निर्मलग्राम’चा बोजवारा

‘निर्मलग्राम’चा बोजवारा

बारामती : बारामती तालुक्यातील ४८ आणि इंदापूर तालुक्यातील १५ गावांनी निर्मलग्रामचे पुरस्कार मिळविले आहेत. नवीन सरकार आल्यापासून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. परंतु, त्याची तीव्रता कमी आहे. काही बोटांवर मोजण्याइतक्या गावांनी निर्मलग्रामचे सातत्य राखले आहे. मात्र, बहुतेक गावांमध्ये पुरस्कार मिळविल्यानंतर या गावाने कधी निर्मलग्राम स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कार प्राप्त केला आहे, असे चित्रच पाहण्यास मिळत नाही.
निर्मलग्राममुळे गावच्या गाव स्वच्छ झाली. त्यातील सातत्य हरवले. गावे बकाल होत गेली. अपवाद पुणे जिल्ह्यातील काटेवाडीगाव. गावातील लोकांची मानसिकता बदलली. गावाचा स्वच्छतेच्या माध्यमातून कायापालट झाला. स्वच्छता अभियान स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास ५० लाखांहून जास्त रकमेची बक्षिसे पटकावली आहे. या गावाने आजपर्यंत सातत्य जपले आहे. त्याचप्रमाणे काऱ्हाटी गावातील चित्रदेखील आशादायक आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देण्यात येते.

Web Title: Depletion of 'Nirmalgram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.