पिंपळवंडी ते भीमाशंकर कावड सोहळ्याचे बुधवारी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:56+5:302021-02-05T05:05:56+5:30
श्रीक्षेत्र पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी ते श्रीक्षेत्र भीमाशंकर कावड सोहळ्याचे प्रस्थान बुधवारी ३ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती कावड सोहळ्याचे संस्थापक ...

पिंपळवंडी ते भीमाशंकर कावड सोहळ्याचे बुधवारी प्रस्थान
श्रीक्षेत्र पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी ते श्रीक्षेत्र भीमाशंकर कावड सोहळ्याचे प्रस्थान बुधवारी ३ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती कावड सोहळ्याचे संस्थापक विकास काकडे अध्यक्ष बाबाजी काकडे व उपाध्यक्ष रवींद्र बेल्हेकर यांनी दिली.
पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्ट व पिंपळेश्वर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून या कावड सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या कावड सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. ३) अभिषेक, गंगापूजन व कावडपूजन झाल्यानंतर सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. हा कावड सोहळा वारुळवाडी पोखरी चिंचोली गोहे बुद्रुक राजपूर यामार्गे शनिवारी दि. ६ श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पोहोचणार असून, त्या ठिकाणी गुप्त भीमाशंकर येथे अभिषेक व पूजा करुन रविवारी (दि. ७) हा कावड सोहळा परतीच्या मार्गाने पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी येथे येणार आहे.
या कावड सोहळ्याची सांगता सोमवारी (दि. ८) होणार असून, यानिमित्त पहाटे आरती व सत्यनारायण महापूजा व त्यानंतर हभप विकास महाराज हगवणे गिरवली यांचे कीर्तन व त्यानंतर प्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.