लोणावळ्यात आढळला डेंग्यूचा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:36 IST2017-08-01T13:35:05+5:302017-08-01T13:36:51+5:30

लोणावळ्यातील खोंडगेवाडी येथे एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह लोणावळा नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे

Dengue sufferers found in Lonavla | लोणावळ्यात आढळला डेंग्यूचा रुग्ण

लोणावळ्यात आढळला डेंग्यूचा रुग्ण

ठळक मुद्देलोणावळ्यातील खोंडगेवाडी येथे एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह लोणावळा नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहेलोकप्रतिनिधींकडून डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग व पालिका कर्मचाऱ्यांनी खोंडगेवाडीत पहाणी करून परिसरात औषध फवारणी केली आहे.परिसरात कोठे डेंग्यूच्या आळ्या आहेत का याची पडताळणी सुरु केली आहे.

लोणावळा, दि. 1-  लोणावळ्यातील खोंडगेवाडी येथे एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह लोणावळा नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग व पालिका कर्मचाऱ्यांनी खोंडगेवाडीत पहाणी करून परिसरात औषध फवारणी केली आहे. तसेच परिसरात कोठे डेंग्यूच्या आळ्या आहेत का याची पडताळणी सुरु केली आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव ठाळण्यासाठी नागरिकांनी कोठेही पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरातील पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत. घराच्या परिसरात कोठेही गाड्याचे टायर, नारळाची कवटी, टब अशा वस्तुंमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केलं आहे

Web Title: Dengue sufferers found in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.