शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

डेंग्यूने युवकाचा मृत्यू; नगपरिषदेला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:23 AM

चाकणमधील युवकाचा मृत्यू झाल्यानंतर चाकण परिसरातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवकांनी चाकण नगरपरिषद प्रशासनाला शुक्रवारी धारेवर धरले.

आसखेड : चाकणमधील युवकाचा मृत्यू झाल्यानंतर चाकण परिसरातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवकांनी चाकण नगरपरिषद प्रशासनाला शुक्रवारी धारेवर धरले. याबाबत नियोजन करण्यात नगरपरिषद सपशेल अपयशी ठरल्याबाबत नागरिकांचा आरोप आहे. शहरात डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात होत असताना प्रशासन मात्र योग्य उपाययोजना करण्यात अपयशी ठरली आहे.चाकण नगरपरिषदेकडे धुरळणी यंत्रे पुरेशी नसल्याने धुरळणी वेळोवेळी होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढल्याचा आरोप यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते नीलेश कड-पाटील, सतीश मंडलीक, जमीर काझी, मच्छिंद्र गोर यांनी केला. शहरात स्वच्छता नसल्याने नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. मात्र, तरीही नगरपरिषद तातडीने उपाययोजना करीत नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे केली.यावेळी नगरसेवक शेखर घोगरे यांच्यासह नितीन जगताप, किरण कौटकर, अश्पाक शेख, शंकरराव कड, समीर सिकीलकर, प्रा. पांडुरंग शिरसाट आदींसह नागरिकउपस्थित होते. यावेळी सफाईच्या कामातील कंत्राटदार हटवा, डेंग्यूने युवकाचा मृत्यू झाल्याने स्वच्छतेच्या कामात कसूर करणास जबाबदार अधिकाºयांवर त्वरित कडक कारवाई करा, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात खासगी रुग्णालयांनी उपचार करावेत आणि साथीच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मुख्याधिकारी साबळे यांनी यावेळी सांगितले, की शहरात घरोघरी कचºयाची वाहने येत असतानाही रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांना प्रथम समजावून सांगण्यात येणार असून नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.शहरात धुरळणीसाठी बंद पडलेली यंत्रे तातडीने दुरुस्त करून धुरळणी सुरू करण्यात येणार असून नवीन यंत्रे खरेदी करण्यात येतील. शहरात डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच धुरळणी यंत्रे तातडीने खरेदी करून सर्व प्रभागात वेळेवेळी फवारण्यात येईल, असेही आश्वासन दिले.

टॅग्स :Puneपुणे