कलिंगड, खरबूज आणि पेरूची मागणी अन् दरही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:54+5:302021-03-01T04:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाढत्या उन्हामुळे मागणी वाढल्याने मार्केट यार्डात रविवारी कलिंगड, खरबूज आणि पेरूच्या दरात दहा ते ...

कलिंगड, खरबूज आणि पेरूची मागणी अन् दरही वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या उन्हामुळे मागणी वाढल्याने मार्केट यार्डात रविवारी कलिंगड, खरबूज आणि पेरूच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर पपई, डाळिंब, आणि चिक्कूच्या दरात घट झाली. लिंबू, अननस, मोसंबी, संत्रा, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस १० ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री ४० ते ४० टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे दोन ते तीन हजार गोणी, पेरू ८० ते १०० क्रेट, चिक्कू २ ते अडीच हजार गोणी, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, स्ट्रॉबेरी ८ ते १० टन, द्राक्षे ३० ते ३५ टन इतकी आवक झाली.
---
फुलांचे दर पुन्हा पडले
सद्य:स्थितीत फुलांची आवक ही साधारण आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर निर्बंध आल्याने मागणी आणि दरांमध्ये घसरण झाली आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.