शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रांतीच्या भोगीच्या भाज्यांची वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 13:48 IST

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात.

ठळक मुद्देकाही भाज्यांचे दर वाढणार तर काही स्थिर राहणार कांदा, आले, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची, शेवगा, गाजर आणि घेवड्याच्या दरामध्ये घट कोथिंबिरीच्या दोन लाख जुड्यांची आवक

पुणे : मकर संक्रांतीच्या सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी या हंगामात येणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते. मंगळवार (दि.१४) रोजी साजऱ्या होणाऱ्या भोगीसाठी रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात मोठ्या प्रमाणात भोगीच्या भाज्यांची आवक झाली होती.  आवक जास्त असली तरी मागणी वाढल्याने पावडा, वाटाणा, वांगी आदी भाज्याच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली. तर अन्य भाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात. याचा एक भाग म्हणून संक्रांती निमित्त बहुतेक घरांमध्ये भोगीचा सण साजरा केला जातो. यादिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी आणि हरभरा, वाटाणा, वांगी, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, पावटा सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. यामुळे रविवारी मार्केट मध्ये या भाज्यांची मोठी आवक झाली होती. मार्केटयार्डात रविवारी कांदा, आले, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची, शेवगा, गाजर आणि घेवड्याच्या दरामध्ये घट झाली. तर  बटाटा, भेंडी आणि पावटा, वाटाणाच्या दरामध्ये वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. गुलेटकीड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील तरकरी विभागात रविवारी (दि.१२) सुमारे १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये स्थानिक मालासह परराज्यातील शेतमालाचा समावेश आहे. परराज्यातून आलेल्या मालामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांतुन सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात येथुन ३ ते ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेशातून शेवगा सुमारे ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून १६ ते १७ ट्रक गाजर, गुजरात मधून भुईमुग शेंग १०० पोती, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथुन मिळून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १ हजार ते १२०० पोती, टॉमेटो सहा हजार पेटी, काकडी १० ते १२ टेम्पो, वांगी १० ते १२ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, भुईमूग ५० ते ६० पोती, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळाची १४ ते १५ टेम्पो, कांदा २०० ट्रक इतकी आवक झाली.--कोथिंबिरीच्या दोन लाख जुड्यांची आवकमार्केट यार्डातील भाजीपाला विभागात रविवारी पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.  कोथींबीरीची दोन लाख जुडी तर मेथीची एक लाख जुड्यांची आवक झाली. रविवारी ग्राहकांनी पालेभाज्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :PuneपुणेMakar Sankrantiमकर संक्रांतीvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्ड