शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:17 AM

वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अधिक्षकांना साकडे घातले आहे.

वाडा - वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अधिक्षकांना साकडे घातले आहे.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पटारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रोहीदास पाटील, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष कैलास पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील, तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे या प्रमुख पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ पोलीस अधिक्षक मंजुनाथ शिंगे यांना भेटले. मात्र शिंदे यांनी हे आरोप फेटाळले.सुदाम शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जनतेला वेठीस धरले आहे. निष्पाप नागरिकांवर ते खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. अलिकडेच वाड्यात एका महिलेची छेड काढणाºया ट्रक चालकाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या घटनेशी कोणताही संबंध नसलेल्या काही निष्पाप तरूणांवर त्यांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांवर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तर गॅस पाईपलाईन टाकणाºया रिलायन्स कंपनी विरोधात एखाद्या बाधित शेतकºयाने नुकसान भरपाईकरिता आवाज उठवला तर त्या शेतकºयाला दमदाटी करून जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या ते देत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.तालुक्यातील भंगाराचा धंदा करणाºया व्यापाºयांबरोबर त्यांचे साटेलोटे आहे. तर लोखंडाची वाहतूक करणाºया चालकांकडून रात्री नाक्यावर पोलीस उभा करून खुलेआम वसुली केली जाते असा आरोप निवेदनात केला आहे. तर तालुक्यातील एका पोलीस पाटलाला विनाकारण काही तास पोलीस कोठडीत डांबवून ठेवल्याचा आरोपही केला गेला आहे. आदिवासी नागरिकांचा घरगुती किरकोळ वाद झाला असता दोन्ही गटाच्या आठ ते दहा जणांवर विनाकारण गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत टाकले गेले. अलिकडेच तोरणे इस्पात या कारखान्यात भट्टीचा स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांनी चांगलेच हात धुतल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.मनमानी व भ्रष्ट कारभार करणाºया शिंदेंमुळे पोलीस खात्याची बदनामी होत असल्याने त्यांची तत्काळ येथून बदली करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा सर्व पक्षीय संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात दिला आहे. सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाडा पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आला असून पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा भ्रष्ट कारभार सुरु असून दलालांचा राबता त्यांच्या कार्यालयात असतो. दलाल तासनतास त्यांच्या कार्यालयात बसून असतात. पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज बघितल्यास हे सर्व उघड होईल.- दिलीप पाटील,अध्यक्ष, काँग्रेस वाडा तालुकाशिंदे हे आपल्या पदाचा गैरवापर करीत असून प्रत्येकाला एन्काऊंटर करण्याची धमकी देतात. मी अठरा एन्काऊंटर केले आहेत. अशी दमबाजी करतात.- जितेश पाटील, अध्यक्ष,स्वाभिमान संघटना,पालघर जिल्हाॉसामान्य नागरिकाला कोणत्याही मध्यस्थाशिवाय पोलीस ठाण्यात प्रवेश दिला जात असून प्राधान्याने त्यांच्या तक्रारी नोंदविल्या जातात. वस्तुस्थितीला धरून कायदेशीर कारवाई होत असल्याने काहींचे हितसंबध दुखावले असल्याने असे निराधार आरोप होत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज नियमानुसारच व कायदेशीर पद्धतीने सुरु आहे.-सुदाम शिंदे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार