प्लाझ्मा संकलन किटचा पुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST2021-05-13T04:10:08+5:302021-05-13T04:10:08+5:30
गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना उपचार करताना रेमडेसेविर इंजेक्शन व प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रामुख्याने केला जातो. मात्र रेमडेसेविर इंजेक्शनचा ...

प्लाझ्मा संकलन किटचा पुरवठा करण्याची मागणी
गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना उपचार करताना रेमडेसेविर इंजेक्शन व प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रामुख्याने केला जातो. मात्र रेमडेसेविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर रेमडेसेविर इंजेक्शनला पर्याय म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे सर्वत्रच प्लाझ्माच्या मागणीत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे, अशी माहिती तोडकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत प्लाझ्मा संकलन केंद्र नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी भोसरी, पिंपरी, चिंचवड किंवा पुणे शहरात जावे लागते. मात्र भोसरी, पिंपरी व चिंचवड परिसरातील बहुतेक ब्लड बँकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून प्लाझ्मा संकलन किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्लाझ्मा संकलन किटच्या तुटवड्यामुळे प्लाझ्मा डोनर उपलब्ध असूनही ब्लड बँकांना डोनरचा प्लाझ्मा काढता येत नाही. प्लाझ्मा काढता येत नसल्याने रुग्णांना प्लाझ्मा पुरवता येत नाही. याचा फटका गंभीर लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांना बसत असून रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने तत्काळ प्लाझ्मा संकलन किट उपलब्ध करून घ्यावेत. त्याचबरोबर यापुढील काळातही प्लाझ्मा किटचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी सचिन तोडकर यांनी केली आहे.