वीज खांबाच्या दुरुस्तीची मागणी

By Admin | Updated: May 27, 2014 07:02 IST2014-05-27T07:02:52+5:302014-05-27T07:02:52+5:30

मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ परिसरातील नागरिक वीज मंडळाच्या सावळ्या गोंधळाने त्रस्त आहेत

Demand for power pole repair | वीज खांबाच्या दुरुस्तीची मागणी

वीज खांबाच्या दुरुस्तीची मागणी

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ परिसरातील नागरिक वीज मंडळाच्या सावळ्या गोंधळाने त्रस्त आहेत. वीज मंडळाने पावसाळ्यापूर्वी नादुररुस्त खाबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरात विद्युतपुरवठा करणार्‍या विद्युततारा सैल असल्याने जोराचा वारा आला की, या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणग्या पडतात. या ठिणग्यांतून वणवा पेटून वन विभागाचे नुकसान होत आहे. काही लोखंडी खांब पूर्णत: गंजलेले असल्याने ते वाकले आहेत. सिमेंटचेही काही खांब मोडकळीस आले आहेत. पावसाळ्याअगोदर विद्युत विभागाने दुरुस्ती करावी, असे निवेदन जिल्हा दूधसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, दत्तात्रय शेवाळे, सोमनाथ शिंदे, अनंता ढवळे, विजय काजळे, अंकुश लांडगे, सहदेव केदारी, सुधीर आंद्रे व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for power pole repair