पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:18 IST2021-03-13T04:18:58+5:302021-03-13T04:18:58+5:30
वरवंड,ता. दौंड-पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत चालू करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. ही बससेवा चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले ...

पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत करण्याची मागणी
वरवंड,ता. दौंड-पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत चालू करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. ही बससेवा चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
खासगी वाहतूक, रेल्वेसेवा, एसटी बससेवा पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने, विद्यार्थ्यांना व नोकरदार वर्गाला प्रवास करताना अडचणी येत आहेत. यामुळे ही बससेवा वरवंडपर्यंत चालू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या जरी कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद असले, तरी इतर प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत आहेत.
वरवंड येथे शिक्षणासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असून, गावामध्ये सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महानंदा दूध भुकटी प्रकल्प, पुणे जिल्हा दूध संघ, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या शासकीय कार्यालय असून, यासाठी विद्यार्थी, सरकारी नोकरदार वर्ग, मोठ्या प्रमाणात गाडीने प्रवास करीत असून, यांना प्रवास करताना अडचणी येत आहे. सध्या ही पीएमपीएल बसची सेवा यवतपर्यंत चालू करण्यात आली आहे. वरवंडमध्ये शिक्षणासाठी व नोकरी निमिताने पुणे, हडपसर, लोणीकाळभोर, यवत, भांडगाव, चौफुला, पडवी, सुपा, देऊळगाव गाडा, केडगाव, पारगाव या गावांतून ये-जा करत असतात, यामुळे बससेवेला मोठा फायदा होणार आहे. सध्या कोरोनामुळे शाळेना सुट्टी असली, तरीही शाळा व विद्यालय सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांची अडचण लक्षात घेता, ही बससेवा सुरू होणे गरजेचे आहे. गावातून बससेवा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ मागणी करत असल्यामुळे ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. बस सुरू करण्याची मागणी व ठराव, वरवंड ग्रामशिक्षण संस्था, श्री नागनाथ विद्यालय वरवंड, यांनी मागणीचे पत्र वाहतूक व्यवस्थापक कार्यालय पुणे यांच्याकडे उपसरपंच प्रदीप दिवेकर व राहुल दिवेकर यांनी दिली आहे, तसेच
श्री गोपीनाथ महाराज व्यापारी संघटना यांनी बस चालू करण्यासाठी या आधी निवेदन दिले आहे. पीएमआरडी हद्द वरवंडपर्यंत आहे, यामुळे वरवंडपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू.
पुणे परिवहन महामंडळ वाहतूक व्यवस्थापक कार्यालय पुणे, दत्तात्रय झेंडे वाहतूक व्यवस्थापक, पुणे
पीएमपीएलसाठी ग्रामपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. बस सुरू झाल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रवाशांची सोय होईल.
उपसरपंच प्रदीप दिवेकर
पुणे परिवहन महामंडळ वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांना पत्र देताना उपसरपंच
प्रदीप दिवेकर व राहुल दिवेकर.