शिनोले सेंटरमध्ये ऑक्सिजनबेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:35+5:302021-05-05T04:16:35+5:30
--- तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिनोली येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सेवा ...

शिनोले सेंटरमध्ये ऑक्सिजनबेडची मागणी
---
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिनोली येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील शिनोली येथे कोविड केअर सेंटर युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. पंरतु कोविड सेंटरमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने आरोग्य विभागाने येथे आलेल्या काही रुग्णांंना अवसरी कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. आदिवासी भागातील कोरोना रुग्णांना फक्त होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आदिवासी भागातील आहुपे, भीमाशंकर, पाटण परिसरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची शिनोली कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था केली जात आहे. कोविड सेंटरची क्षमता ९० रुग्णांची आहे. परंतु कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते असल्याने १५० रुग्ण क्षमता असावी. यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामुग्री, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसेवेसाठी पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांची संख्या पुरेशी असावी. कोविड सेंटर हे वसतीगृह असल्याने स्वतंत्र खोल्या असून प्रत्येक खोलीला स्वच्छतागृह आहे. पंरतु गरम पाण्यासाठी गिझर नाही, पाण्याचा तुटवडा आहे, रुग्णवाहिका नाही असे अनेक समस्या आहेत.
आदिवासी भागातील वाढत्या रुग्णांचा आकडा लक्षात घेता शिनोली येथिल कोविड सेंटर मध्ये शंभर बेड वाढवण्यात यावेे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच अत्यावस्थ रुग्णांसाठी किमान पाच ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
--