साप्ते आत्महत्येप्रकरणी ‘मोक्का’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:50+5:302021-07-07T04:12:50+5:30
चित्रपट महामंडळाची मागणी पुणे : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे संघटित गुन्हेगार आहेत. हे कधीच ...

साप्ते आत्महत्येप्रकरणी ‘मोक्का’ची मागणी
चित्रपट महामंडळाची मागणी
पुणे : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे संघटित गुन्हेगार आहेत. हे कधीच चित्रपटसृष्टीत परत येता कामा नये. याप्रकरणी गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सोमवारी ( दि. ५) राज्य शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी (७ जुलै) मंत्रालयामध्ये दुपारी चार वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, गोरेगाव आणि कोल्हापूर येथील फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. आरोपींना मोक्का लागत नाही तोपर्यंत चित्रपट महामंडळ शांत बसणार नाही असे राजेभोसले यांनी सांगितले.
साप्ते यांची आत्महत्या ही चित्रपटसृष्टीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील आरोपींनी ज्यांची फसवणूक केली आहे, अशांनी समोर येऊन माहिती द्यावी, असे आवाहन राजेभोसले यांनी केले.
..................................