पुरंदर उपसा जलसिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:16+5:302021-07-07T04:12:16+5:30
पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमूग, मूग, मुगी, वाटाणा, इत्यादी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या करण्यात ...

पुरंदर उपसा जलसिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी
पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमूग, मूग, मुगी, वाटाणा, इत्यादी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या करण्यात आल्या. जमिनीत पुरेशी ओल असल्याने पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली. सध्या पिकेदेखील वाढीला लागली आहेत. यंदा समाधानकारक पिके येण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्याने पिके पूर्णतः वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवरती पुरंदरचा शेतकरी बसला आहे. मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे यामुळे पिके देखील पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मात्र, पाऊस काही पडेना खरीप हंगामात भरमसाठ खर्च करून पिके वाया जाणार असल्याने वाया जाणारी पिके जगवण्यासाठी बंद असलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
०५ भुलेश्वर
बंद असलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजना.