शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2023 18:02 IST

भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी फायद्याचे ठरणार

डिंभे: पुणे व रायगड जिल्ह्याला जोडण्यासाठी भीमाशंकर ते खांडस असा रोपवे व्हावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याबाबत रोप वे कृती समितीची बैठक नुकतीच कडाव -खांडस येथे पार पडली आहे. या मागणीसाठी कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असून एक लक्ष सह्यांचे निवेदन त्यांना सादर करणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खांडस गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर वसले आहे.  पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातून खांडस मार्गे भीमाशंकरकडे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्यातील खांडस गावापासून अतितीव्र उत्तराचा कडा चढून शिडी घाटाच्या मार्गे पदरवाडी पासून भीमाशंकर कडे प्रवास करताना पहावयास मिळतात.   पर्यटनासाठी चालना मिळावी, स्थानिक लोकांना  भीमाशंकर ते खांडस असा सुखकर प्रवास करता यावा यासाठी भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी हा रोपवे फायद्याचे ठरणार आहे. असून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमालाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांना रोपवे उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या ठिकाणची यादी सादर करणे बाबत सुचविण्यात आले होते.  या कार्यक्रमांतर्गत डोंगराळ प्रदेश शहरातील अतिगर्दीची ठिकाणी दुर्गम भागांना रोपवेद्वारे जोडण्यासाठी शासनामार्फत समन्वय करण्यासाठी मुख्य अभियंता सां.बा.विभाग मुंबई यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनामार्फत सादर केलेल्या यादीमध्ये भीमाशंकर रोपवे चा समावेश आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरSocialसामाजिकTrekkingट्रेकिंगtourismपर्यटनNitin Gadkariनितीन गडकरी