शिक्षक बदली प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST2021-08-14T04:15:18+5:302021-08-14T04:15:18+5:30
--- केडगाव : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकर सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब ...

शिक्षक बदली प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी
---
केडगाव : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकर सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांनी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, कास्ट्राईब शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये संचमान्यता, टीईटी परीक्षा, अनुकंपा भरती आणि नियमित भरती, शिक्षक भरती वेळापत्रक, शिक्षक संवर्गासाठी रोस्टर मान्यता, शाळा सुधार खात्यात समुदाय सहभाग, जिल्हा परिषद आणि जागतिक बँक प्रकल्प, शाळा दुरुस्ती अनुदान, झेडपी उपक्रम, शाळांसाठी पंधराव्या वित्त आयोगचा जि.प. कर निधी ''शिक्षकांना कोव्हीड ड्युटी दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे, समग्र शिक्षा अंतर्गत अभियांत्रिकी पदांच्या रिक्त जागा व कंत्राटी भरती, जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळा एकाच परिसरात घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून निर्णय घेण्यात येणार आहे.
--
१३ केडगाव : शिक्षक संघटना मागणी
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना गौतम कांबळे व संघटनेचे कार्यकर्ते
130821\13pun_6_13082021_6.jpg
१३ केडगाव : शिक्षक संघटना मागणीग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना गौतम कांबळे व संघटनेचे कार्यकर्ते