शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान, नुकसानभरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:43 IST

अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

भोर  - भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाउस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भातपिक पावसात भिजले असून शेतक-यांचे ३० ते ३५ टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पिक असुन ७४०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पश्चिम भागातील हिर्डोशी, आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खोºयात मागील १५ दिवसांपासून भात काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी तुंबून राहिले. शेतात कापून ठेवलेले तसेच खळयावर आणुन झोडणी सुरु असलेले भात पीक पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. भातपिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे भाताचे पिक चांगले होते. मात्र शेवटचे दोन पाऊस मिळाले नाही. परिणामी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे उत्पादन घटले होते. उरले सुरले पीक दिवाळीच्या अगोदर काढावे म्हणून शेतकरी भात कापणी व झोडणीच्या घाईत होता. मात्र पुन्हा या सततच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रायरी, साळव, कंकवाडी, करंजगाव, म्हसर बु .म्हसर खुर्द, निगुडघर, आपटी, कारी, भावेखल, अंगसुळे, पºहर, गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली खुर्द व बु,दुर्गाडी अभेपुरी, शिळींब, शिरगाव, हिर्डोशी, वारवंड, देवघर, वेनुपुरी, कोंढरी आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खो-यातील पिक मोठया प्रमाणात खराब झाले आहे. आतापर्यंत ५० टक्के भाताची कापणी झाली असुन सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.पाऊस नसल्याने पिकात दाणा भरला नाहीहळव्या जातीच्या भातात पळंज निर्माण झाले. दुसरीकडे गरव्या जातीच्या भातपीक काढणी सुरु असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे पिक काळे पडले आहे. पिकावर बुरशी वाढली उत्पादनात मोठी घट होणार आहे. भोर तालुक्यालादुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याने कशा प्रकारे नुकसानभरपाई देणार की शेतकºयांना वाºयावर सोडणार? अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे