शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तळेगाव चौकात भिकाऱ्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 9:54 PM

पुणे-नासिक महामार्गावर प्रवाशांसाठी बसथांबा शेडची मागणी नागरिकांकडून होत आहे. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते

चाकण : पुणे-नासिक महामार्गावर प्रवाशांसाठी बसथांबा शेडची मागणी नागरिकांकडून होत आहे. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. काही प्रवासी तर धोकादायकरीत्या महामार्गावरील दुभाजकांवर उभे राहून वाहनांची वाट पाहतात, त्यांच्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनाही अडथळा होतो.  अशावेळी जोरदार वेगाने आलेल्या वाहनांपासून अपघाताचा धोका होण्याचा संभव असतो. तळेगाव चौकातील सिग्नल जवळ महामार्गावर भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा व भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.येथील सिग्नलजवळ भिकारी व त्यांची अल्पवयीन बालके रस्त्यावर धोका पत्करून गाड्या थांबताच भीक मागण्यासाठी आडवी तिडवी पळत असतात, कधी वाहनांना आडवे जाऊन तर कधी दुभाजकावरून पळत असतात, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे येथील कोहिनुर सेंटरच्या पायऱ्यांवरही भिकारी महिला व लहान बालिका भीक मागत असतात. त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मजूर अड्ड्याजवळील बस थांबा गायब झाला असून नासिक कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने सिग्नल जवळच थांबत असल्याने या रस्त्यावरील बस थांबा प्रवासी वापरात नाही. काही लोक या थांब्याचा वापर पथारी दुकानासारखा करीत आहेत. तळेगाव चौकातील पोलीस चौकी, मजूर अड्डा व नासिक रस्त्यावर सवेरा हॉटेल समोर मोठ्या स्वरूपाचे बसथांबे टाकण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या रस्त्यावरील थांब्यावर कामगार व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच सर्व्हिस रस्त्यावर टपऱ्या, हातगाडया व अवैध वाहनांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. येथील पोलीस चौकीजवळ थांबा उभारण्याची मागणी होत आहे.