डिलिव्हरी बॉयने दिली ‘टीप’
By Admin | Updated: June 18, 2015 00:06 IST2015-06-18T00:06:49+5:302015-06-18T00:06:49+5:30
कुरिअर देण्याच्या बहाण्याने शेअर ब्रोकरला कोयत्याचा धाक दाखवून १ कोटी ९६ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकूण

डिलिव्हरी बॉयने दिली ‘टीप’
पुणे : कुरिअर देण्याच्या बहाण्याने शेअर ब्रोकरला कोयत्याचा धाक दाखवून १ कोटी ९६ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. हा दरोडा डिलिव्हरी बॉयने माहिती पुरविल्यामुळे टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी अटक आरोपींपैकी सात जणांना १९ जूनपर्यंत, तर चार जणांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (वय २४, रा. स्पाईन रोड, चिंचवड), रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय २४, रा. थेरगाव), बाळू महादेव बनसोडे (वय २२, रा. सद्गुरू सोसायटी, ता. हवेली), समीर गणपत मोरे (वय ३२, रा. काळेवाडी), पंडित प्रभाकर कांबळे (वय २५, रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी), अनिल भानुदास सांगळे (वय २८, रा. त्रिवेणीनगर, निगडी), गुलाब नामदेव नेहरे (वय ४०, रा. सद्गुरूनगर, भोसरी) या ७ जणांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मनोज बाबुलाल यलपूर (वय ४४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), राजेश हनुमंत कांबळे (वय ४१, रा. मिश्रा निवास, नेहरूनगर पिंपरी), सागर महादेव पासलकर (मु. पो. शिरकोळी, ता. वेल्हे, जि. पुणे), राजा वेलेस्वामी पिल्ले (वय ५१, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) या ४ आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अतुल आंबेकर (वय ४०, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ७ मे २०१५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोखलेनगरमध्ये घडली होती.
याप्रकरणी अतुल आंबेकर यांनी फिर्याद दिली आहे. आंबेकर हे लाईफ जनरल इन्शुरन्स अॅन्ड ब्रोकर्स कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून अकाउंट असिस्टंट आहेत. तर कंपनीचे मालक साईराम अय्यर आहेत. आरोपी कर्जबाजारी होते. त्यामुळे झटपट पैसे कमविण्याच्या शोधात असलेल्या आरोपींना आंबेकर यांच्या कार्यालयासमोरच्या आॅफिसमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरीबॉयने पैशांची माहिती दिली होती. ही माहिती पासलकर, पिल्ले, कांबळे यांनी गुलाब नेहरे आणि राजेश कांबळे यांना दिल्यावर त्यांनी रेकी केली.
(प्रतिनिधी)
- घटनेच्या दिवशी कुरिअरवाला असा आवाज देऊन ते कार्यालयात घुसले. चाकूच्या धाकाने आरोपींनी आंबेकर यांचे हातपाय बांधून ठेवत १ कोटी ९५ लाख रुपये लुटले. त्यानंतर परत जाताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, ब्रेसलेट, मोबाईलही चोरुन नेला होता. पुढील तपास चतु:श्रृंंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण सावंत करीत आहेत. सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी चौघाही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.