शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:40 IST

कळस : धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा विरोध मावळला असून, सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब होत आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्यांची ...

कळस : धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा विरोध मावळला असून, सरकारच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाला विलंब होत आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्यांची आमच्यासोबत एक तासाची बैठक घेतल्यास, आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणे कसे शक्य आहे ते स्पष्ट करू. भाजपा सरकारने आरक्षण न दिल्यास यापुढे झेंडा आमचा असेल, त्याचा दांडाही आमचाच असेल. नेताही आम्हीच निवडून देऊ, अशी भूमिका धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली.रुई (ता. इंदापूर) येथे बाबीरदेवाच्या यात्रेनिमित्त अमोल भिसे मित्र मंडळातर्फे गजढोल स्पर्धा व बाबीर भाविकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी कार्यक्रमाला आमदार दत्तात्रेय भरणे, उत्तमराव जानकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक अमोल भिसे आदी उपस्थित होते. समाजातील तरुण उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी,सत्तेत वाटा मिळण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे.यामुळे येणाऱ्या चार महिन्यांत प्रत्येकाने जागे राहिले पाहिजे. आगामी विधानसभेला इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रस्थापितांनी त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्यास इतर ठिकाणी अडचणीत आणण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.तर धनगर समाजाचे ९० आमदारराज्यात पिढ्यान् पिढ्या प्रस्थापितांचे राज्य आहे. सत्ता कायम घरात राहण्यासाठी ठराविक प्रस्थापित सतत कार्यरत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील सत्तेत वाटा मिळाल्यास सुमारे ९० आमदार हे धनगर समाजाचे असतील. एखादा-दुसरा समाजाचा आमदार झाल्यास त्याचीही कोंडी करण्याचे काम सत्ताधारी करीत असतात. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्र काढून धनगड व धनगर हे एकच असून, मराठी व इंग्रजी भाषेतील उच्चारांचा विपर्यास केला आहे. यामुळे अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचे आदेश द्यावेत. मात्र, धनगर समाजासाठी आरक्षणाची घटनेत तरतूद असताना केंद्र शासनाकडे शिफारस करण्याबाबत चुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका, जलसंधारणमंत्री राम शिंदेकळस : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास भाजपा सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्टीकरण जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये अमोल भिसे मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गजढोल स्पर्धा व बाबीर भक्तांच्या मेळाव्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती प्रवीण माने आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गेल्या सरकारकडून बºयाच वर्षांपासून आशा ठेवल्या होत्या. पण आरक्षण मिळाले नाही. आता समाजाने आमच्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. पण आमच्याकडून अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री देतो. आम्ही जरी सध्या सत्तेत असलो, तरी समाजाच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले आहे. यामुळे समाजाच्या आरक्षणाच्या विषयाबाबत आपणही नेहमी समाजाच्या बाजूने असू असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथे मूलभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. सध्या केलेले नियोजन उत्तम आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली कामेही उल्लेखनीय आहेत. मात्र, पुढील वर्षी याबाबत अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजन केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सात कोटींचा विकास निधी आणून देवस्थान व गावाचा कायापालट केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतील. आरक्षणाचा प्रश्न जटिल असल्याने, निर्णयाला वेळ लागत आहे.- राम शिंदे, जलसंधारणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :reservationआरक्षणPuneपुणे