शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:20 IST

धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. अशी कबुली राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात दिली.

पुणे: धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यामुळे धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे,अशी कबुली खुद्द राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. मात्र,लोकसभा निवडणूकीपूर्वी सर्व मागण्या मान्य होतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.    पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती महोत्सव समितीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. धनगर समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) अहवाल धनगर आरक्षणाच्या विरोधी येत होता. बार्टीचा अहवाल दोन वेळा विरोधी आल्यामुळे शासनाने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) सर्वेक्षण समितीचीकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली. या समितीचा अहवाल धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने येईल,अशी आमची अपेक्षा आहे. मात्र,हा अहवाल पूर्ण होण्यास विलंब होत आहे.      शिंदे म्हणाले,पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र,अद्याप आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे. परंतु,आरक्षणाला उशीर होत असला तरी निवडणूकांपूर्वी आरक्षण मिळेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून आरक्षणाचा व विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळावे याबाबत मागणी केली जाईल. एकदा मंत्रीमंडळ बैठकीत विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विषय चर्चेसाठी आला होता. मात्र, त्यावर काही मतमतांतरे समोर आल्यामुळे उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडूनही अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून याबाबत पाठपुरावा केला जाईल,असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRam Shindeप्रा. राम शिंदेreservationआरक्षणuniversityविद्यापीठ