शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार

By नितीश गोवंडे | Updated: May 10, 2023 16:34 IST

रेल्वे उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार

पुणे : रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी दुसरी भारत गौरव रेल्वे उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. २८ एप्रिल रोजी पुण्यातूनच पहिली भारत गौरव रेल्वे दिव्य काशी यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. आता दुसरी रेल्वे उद्या ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’ साठी रवाना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरातून ‘देखो अपना देश’ या संकल्पनेनुसार देशभरातून भारत गौरव सेवा पुरवली जात आहे. या सेवेच्या आतापर्यंत २९ फेऱ्या झाल्या असून, त्यातील ८ विविध राज्यांमधून तर ४ केंद्रशासित प्रदेशातून झाल्या आहेत. या रेल्वेने एकूण ७५० प्रवासी प्रवास करणार असून ११ ते २० मे दरम्यान ही रेल्वे उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार आहे.

प्रतिव्यक्ती दर..

- स्लीपर क्लास - १६ हजार ३००- वातानुकूलित तृतीय श्रेणी - २८ हजार ६००- वातानुकूलित द्वितीय श्रेणी - ३४ हजार २००

‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..

- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार- सोबतीला गाइड असणार- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीrailwayरेल्वेticketतिकिटtourismपर्यटन