देहूरोडमध्ये लष्कराच्या कर्तव्यावरील सुभेदार जवानाची गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:08 IST2019-07-05T23:07:35+5:302019-07-05T23:08:03+5:30
लष्करी विभागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी सुभेदार जवानाने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि.५ ) दुपारी चारच्या सुमारास घडली.

देहूरोडमध्ये लष्कराच्या कर्तव्यावरील सुभेदार जवानाची गोळी झाडून आत्महत्या
देहूरोड : येथील लष्करी विभागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी सुभेदार जवानाने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि.५ ) दुपारी चारच्या सुमारास घडली. सीओडी डेपो येथील गेट क्र.२ वर सेवेवरील कार्यरत असताना ही घटना घडली.
लान्स नायक (सुभेदार ) नरेंद्र सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सीओडी डेपोतील गेट क्र. २ वर वॉच टॉवरवर ड्युटीवर असताना स्वतःजवळ असणाऱ्या रायफलमधून स्वतःच्या हनुवटी खाली गळयावर रायफलने गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्यासह कर्मचारी पोलीस पथकानी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशीरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रूग्णालयात हलविण्यात आला आहे, अशी माहिती वरीष्ठ निरीक्षक कल्याणकर यांनी दिली आहे .