शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी, फ्लॉवर, शेवगा भावात घट

By admin | Updated: August 17, 2015 02:51 IST

श्रावण महिना सुरू झाला असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्यांची पुरेशी आवक होत असल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले

पुणे : श्रावण महिना सुरू झाला असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्यांची पुरेशी आवक होत असल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. भेंडी, कारली, फ्लॉवर, शेवगा, घेवड्याच्या भावात घट झाली, तर हिरवी मिरची व वांग्याचे भाव वाढले.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याप्रमाणेच ही आवक कायम राहिल्याने फळभाज्यांच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही. सध्या श्रावण महिन्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. पावसाने दडी मारली असली तरी बाजारात भाज्यांची मुबलक आवक अद्याप सुरू आहे. पुणे विभागातील काही भागात अधून-मधून पावसाने हजेरी लावल्याने तसेच पाणी उपलब्ध असलेल्या भागातून भाजीपाला बाजारात येत आहे. रविवारी भेंडी, फ्लॉवर व घेवडा या भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति दहा किलोमागे प्रत्येकी सुमारे ८० रुपयांनी, तर कारल्याचे भाव ५० रुपयांनी उतरले. कारल्याच्या भावात ५० रुपयांची, तर शेवग्याच्या भावात १०० रुपयांची घट झाली. हिरवी मिरची, वांगी व कोहळ्याचे भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वाढले.पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी व शेपूच्या भावात शेकडा जुडीमागे २०० रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे भाव स्थिर राहिले. बाजारात सुमारे सव्वा लाख जुडी कोथिंबीरची तर ८० हजार जुडी मेथीची आवक झाली. घाऊक बाजारात परराज्यातून कर्नाटकातून ४ते ५ टेम्पो मटारची तसेच कोबीची दोन ट्रक आवक झाली. शेवग्याची आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश, कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची तसेच इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजरची आवक झाली आहे. बटाट्याची इंदूर, आग्राहून ६० ट्रक, लसूणची मध्य प्रदेशातून तीन हजार गोणीची आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आल्याची ६०० ते ६५० पोती, बंगळुरूहून २०० गोणी, वाई, सातारा, पारनेरहून मटारची दोन टेम्पो, पावट्याची पुणे विभागातून ७ ते ८ टेम्पो, टोमॅटोची साडेसहा हजार पेटींची आवक झाली. फ्लॉवरची पुणे विभागातून १८ ते २० टेम्पो, कोबीची १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली. भुईमूग शेंगाची दीडशे गोणी, तांबडा भोपळ्याची ८ ते १० टेम्पोची आवक झाली.