शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:09 IST

जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

पिंपरी : तथागत गौतम बुद्ध यांनी क्षमा, शांती, त्याग आणि सेवा-समर्पणाचा संदेश दिला. महाराष्ट्राला गौतम बुद्धांच्या या शिकवणीची गरज आहे. साधू-संतांचे विचार सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक असताना आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे, अंतर पाडण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. मात्र, हे प्रयत्न जनतेनेच हाणून पाडायला हवेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी च-होलीत केले.

च-होली-वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) उभारलेल्या प्रशिक्षण संकुलातील कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, रामेतीचे प्राचार्य विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'राज्यातील कायदा-सुव्यवस्था राहण्याकरिता मुख्यमंत्री, गृहमंत्री मनापासून प्रयत्न करीत आहेत. अधिकारी वर्गाची त्यांना साथ लाभते. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. कृषी विभागाला सन २०२२-२०२३ मध्ये ३ हजार ३५ कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. कृषी आणि संलग्न संस्थांसाठी २३ हजार ८८८ कोटींची तरतूद केली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांसोबतच कृषी संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देऊन कृषी विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

त्यातून हिंगोली येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधनाकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय चांगली घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरी