शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दीपक मानकरांनी मालमत्तेच्या विवरण पत्रात दिली खोटी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:20 IST

दीपक महापौर यांनी स्वत:च्या व नातेवाईकांच्या मालमत्तेसंदर्भात दिलेल्या विविरण पत्रात व तपासून समोर आलेल्या मालमत्तेत तफावत असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. 

पुणे : कसबा पेठ विधानसभा आणि महानगर पालिकेच्या सभासदासाठी निवडणूक लढवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक महापौर यांनी स्वत:च्या व नातेवाईकांच्या मालमत्तेसंदर्भात दिलेल्या विविरण पत्रात व तपासून समोर आलेल्या मालमत्तेत तफावत असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. 

          विवरण पत्रातील आणि तपासातील मालमत्ते तफावत आढळल्याने मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात आणि जिल्हात त्यांच्या इतर मालमत्तेबाबत देखील कसून चौकशी केली जात आहे. सामाजिक कार्यक र्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणात मानकर आरोपी असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झडती घेतली असता त्यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे ुुप्राप्त झाली आहेत. त्यामुळे विवरण पत्र व जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत चौकशी करण्यासाठी मानकर यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार वकील विलास पठारे यांनी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी मानकर यांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  

      ४१८ रास्ता पेठ येथील मिळकतीचा विक्रीचा व्यवहार पोरवाल बिल्डर्स यांच्या बरोबर झाला होता. त्यावेळी जगताप यांना टाळून थेट मानकर यांच्याशी व्यवहार करा व ७ कोटी रुपये द्या, असे सांगण्यात आल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे. या गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांचे इनकम टॅक्स रिटर्स, बँक स्टेटमेंट, शेअर्स बाबतची कागदपत्रे हस्तगत करण्यात आले असून त्याचे फॉरेन्सीक आडीट करण्यासाठी सीएची नेमणूक करण्यात आली आहे. तपासणीसाठी देण्यात आले आहे. मानकर यांची पुणे जिल्ह्याबाहेर स्थावर व जंगम मालमत्ता असून त्याचे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. हे व्यवहार करीत असताना त्यांचा हस्तक कोण होता.  मानकर व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने विविध ठिकाणी कंपन्या असून काही कंपन्यांमध्ये ते स्वत: संचालक आहेत. २००९ ते २०१८ पर्यंत त्यांनी भरलेल्या आटी रिटर्न्स व तपासामध्ये प्राप्त झालेल्या मालमत्ते संदर्भात तफावत दिसत आहे, या सर्वांचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पठारे यांनी केली. मानकर यांच्यावतीने अ‍ॅड. सुधीर शहा आणि अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद केला. मानकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.    

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस