शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जननायक अटलजींना रंगावलीतून दीप श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 21:19 IST

मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे.

ठळक मुद्देउदय जोशी मित्र परिवारतर्फे आयोजन ;  अटल कट्टयावर पुणेकरांकडून अभिवादन

पुणे : गंगाजल मे बहती हुूई हमारी अस्थि को, कोई कान लगाकर सुनेगा तो एकही आवाज आएगी... भारत माता की जय, अशा काव्यातून देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणा-या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यामध्ये रंगावलीतून दीपश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अटलजीं ना अनेकदा भेटलेले त्यांचे पुण्यातील स्नेही आणि अटल कट्टयावर दर महिन्याला जमणारे पुणेकर यांनी मोठया संख्येने अटलजींना श्रद्धांजली देण्याकरीता गर्दी केली.उदय जोशी मित्र परिवारतर्फे सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिर चौकातील अटल कट्टयावर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना रंगावलीतून दीपश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अटलजींचे स्नेही हरिभाऊ नगरकर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी, भा.ज.पा. शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवी अनासपुरे, किशोर शशितल, उदय जोशी, शुभदा जोशी, रामलिंग शिवणगे, किशोर खैराटकर, अजित सुखात्मे, किरण वाईकर, सुनंदा गोरे, शितल जोशी, रोहिनी खैराटकर, अनिल गानू, बाबा शिंदे, आप्पा जोगळेकर आदी उपस्थित होते.रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली रेखाटली.हरिभाऊ नगरकर म्हणाले, अटलजींशी अनेकदा दिल्लीसह पुण्यामध्ये देखील भेट झाली. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. देशाचा विचार करणारे ते लोकनेते होते, असेही त्यांनी सांगितले. डॉ.न.म.जोशी म्हणाले, अटलजी पुण्यात आले असताना अनेकदा त्यांची माझी भेट झाली आहे. एकता मासिकासह एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने देखील मी त्यांना भेटलो आहे. तसेच हॉटेल श्रेयसमध्ये त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आहे. योगेश गोगावले म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण निर्माण करण्याची शक्ती होती. त्यांनी दिलेले विचारधन आपण रोजच्या जीवनात अंमलात आणले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदय जोशी म्हणाले, मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे. अटलजींमधील विविध गुणांना नागरिकांसमोर आणून उत्तम सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा