खामगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:13 IST2021-08-23T04:13:46+5:302021-08-23T04:13:46+5:30

खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बोरीभडक, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, कासुर्डी, सहजपूर, नांदूर, खामगाव या गावांचा समावेश असून, कार्डियाक ...

Dedication of ambulance at Khamgaon | खामगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खामगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बोरीभडक, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, कासुर्डी, सहजपूर, नांदूर, खामगाव या गावांचा समावेश असून, कार्डियाक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघातसमयी तसेेच आरोग्य विषयांसाठी परिसरातील नागरिकांसाठी मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सर्वच अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका मिळाल्यामुळे अपघातसमयी नागरिकांना मदत मिळणार आहे.

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सरपंच योगेश मदने, माजी सरपंच सुखदेव चोरमले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री खेडेकर, राजेंद्र जगताप, संजय नागवडे, दत्तोबा तांबे, विशाल थोरात, अनिल नागवडे उपस्थित होते.

२२ पाटेठाण

Web Title: Dedication of ambulance at Khamgaon