चौफुला येथे ॲम्बुलन्सचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:12+5:302021-07-19T04:08:12+5:30

:चौफुला येथे स्वर्गीय तुकाराम धायगुडे प्रतिष्ठानच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्व. तुकाराम खंडुआण्णा धायगुडे व सविताताई ...

Dedication of ambulance at Chaufula | चौफुला येथे ॲम्बुलन्सचे लोकार्पण

चौफुला येथे ॲम्बुलन्सचे लोकार्पण

:चौफुला येथे स्वर्गीय तुकाराम धायगुडे प्रतिष्ठानच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्व. तुकाराम खंडुआण्णा धायगुडे व सविताताई तुकाराम धायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी ॲम्बुलन्स मोफत लोकार्पण करण्यात आले.

या वेळी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर, गोशाळेस चारावाटप, वृक्षारोपण, हभप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तनाआधी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,कांचंन कुल,आनंद थोरात,भाऊसाहेब करे,वासुदेव काळे, सरपंच सुनील सोडनवर , राजेंद्र‌ केसकर, जयवंत पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी २५२ रुग्णांनी आरोग्य तपासणी व ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन दिनेश गडधे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विश्वराज हॉस्पिटल,रोटरी ब्लड बँक दौंड,कैलास आबा शेलार यांचे सहकार्य लाभले.

चौफुला तालुका दौंड येथे ॲम्बुलन्सचे लोकार्पणप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, रमेश थोरात,कांचन कुल आदी मान्यवर.

Web Title: Dedication of ambulance at Chaufula