शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट
By Admin | Updated: August 4, 2014 04:14 IST2014-08-04T04:14:15+5:302014-08-04T04:14:15+5:30
या परिसरामध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट
निमगाव केतकी : या परिसरामध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनल्याने शेळ्या, मेढ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे मटणाचे दर गगनाला भिडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निमगाव केतकीसह परिसरातील पिटकेश्वर, सराफवाडी, शेळगाव, कचरवाडी, व्याहळी, कौठळी, वरकुटे, तरंगवाडी, गोतंडी आदी गावांसह अनेक वाड्या वस्त्यांवरील शेतकरी शेळ्या आणि मेंढ्यापालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत होते. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी या व्यवसायाला प्राधान्य देत होते. या काळामथ्ये माळराने मोकळी होती. यामुळे चाऱ्याची कमतरता
भासत नव्हती.
मात्र आता क्षेत्र बऱ्यापैकी बागायत झाले आहे. त्यामुळे शेळ्या आणि मेढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम या प्राण्यांची संख्या घटण्यावर झाला आहे. (वार्ताहर)