गाव बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा निर्णय

By Admin | Updated: August 17, 2015 02:49 IST2015-08-17T02:49:30+5:302015-08-17T02:49:30+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत प्रत्येक महिन्याला (पहिल्या बुधवार) सर्व ग्रामस्थांनी गाव बैठक घेऊन गावातील सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्न सोडवून

The decision to solve the problems by meeting a village meeting | गाव बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा निर्णय

गाव बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा निर्णय

लोणीकंद : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत प्रत्येक महिन्याला (पहिल्या बुधवार) सर्व ग्रामस्थांनी गाव बैठक घेऊन गावातील सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्न सोडवून पारदर्शक कारभार करण्यात येईल, अशी घोषणा फुलगावचे सरपंच सुनील वागस्कर यांनी केली. फुलगाव (ता. हवेली) येथे ६९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन, प्रभात फेरी, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि ग्रामसभा झाली. या वेळी वागस्कर बोलत होते. सुनील वागस्कर, संजय धोत्रे, नारायण खुळे, चंद्रकांत जाधव, नीलेश शिंदे यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजवंदन झाले.
धोत्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कवायती सादर केल्या. विविध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक पंडित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ लोणकर यांनी आभार मानले.

Web Title: The decision to solve the problems by meeting a village meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.