शिर्डी देवस्थानच्या निर्णयाला ब्राम्हण महासंघाच्या महिला आघाडीचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:51+5:302020-12-04T04:29:51+5:30
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, पुणे शहराध्यक्ष ॲड. नीता जोशी, प्रदेश महिला समन्वयक तृप्ती तारे, रसिका घाणेकर, क्रांती ...

शिर्डी देवस्थानच्या निर्णयाला ब्राम्हण महासंघाच्या महिला आघाडीचा पाठिंबा
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, पुणे शहराध्यक्ष ॲड. नीता जोशी, प्रदेश महिला समन्वयक तृप्ती तारे, रसिका घाणेकर, क्रांती गोखले, सुमन कुलकर्णी उपस्थित होते.
बर्वे म्हणाल्या,
देवस्थान हे सहलीचे ठिकाण नाही. ज्याप्रमाणे मंदिरात स्वच्छता राखावी, शांतता पाळावी, लहान मुलांना सांभाळावे अशा सूचना दिल्या जातात. त्याप्रमाणे कपड्यांबाबतही आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप दिवसानी मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाली. तिरुपती बालाजी मंदिर, गुरुनानक गुरुद्वारा अशा ठिकाणी नियमांचे पालन केले जाते. मग या निर्णयाचेही पालन करावे.
-----
शिर्डीच्या निर्णयाबाबत आंदोलन करणे हा पर्याय नाही. अभिव्यक्तीच्या नावाखाली काही करू नये. समाेपचाराने मार्ग निघू शकतो. काही संस्था आणि व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी असे उद्योग नेहमीच करतात. विरोधासाठी त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे.
- नीता जोशी, पुणे शहराध्यक्ष