शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Murlidhar Mohol: राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम निर्माण होतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:34 IST

राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात विसंवाद दिसून येतोय

पुणे : पुणे शहरात कोरोना आटोक्यात येतानाचे चित्र दिसू लागले आहे. दिवसाला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही ६० ते ७० दरम्यान आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत नाट्यगृह आणि सिनेमागृह १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिली. परंतु त्याच दिवशी राज्य शासनाकडून ओमायक्रॉन विषाणूच्या अनुषंगाने नवी नियमावली जाहीर करण्यात आली. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ''राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात विसंवाद दिसून येतोय. तसेच शासनातील मंत्र्यांच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम निर्माण होतोय'' असते ते यावेळी म्हणाले आहेत.    मोहोळ म्हणाले, ''महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात येत असताना सर्व गोष्टींना सुरु होण्यास परवानगी देण्यात आली. पण नाट्यगृह आणि सिनेमागृह यांचा अजिबात विचार केला जात नव्हता. पण कलाकारांच्या रोजगार या मुद्द्यावरून अखेर राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली. त्या निर्णयाने कलाकारांना फारसा दिलासा मिळाला नाही. हा मुद्दा अजित दादांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित दादांनी शहरांतही सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन १०० टक्के मान्यता दिली. मात्र मुख्यमंत्री यांनी त्याच दिवशी सायंकाळी नव्या नियमावलीत नाट्यगृह आणि सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे नमूद केले. पुणे शहराचे पालकांमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने ते पुणे शहराबद्दल काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. अजूनही आम्ही १०० टक्के क्षमतेने सुरु राहण्याबाबत पालकांमंत्री काय निर्णय घालतील याची वाट पाहत आहोत. कदाचित पुन्हा एकदा अजित दादा मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि हा निर्णय कायम होईल अशी अशा आहे. असाही ते म्हणाले आहेत. 

राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने विसंवाद 

राज्यात शाळा सुरु करणे, नियम व अति शिथिल करणे याबाबत शासनातील मंत्री वेगवेगळे निर्णय घेतात. तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यातील विसंवाद होत असेल. त्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण होतोय.

टॅग्स :MayorमहापौरAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे