शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Pune: पुण्यातील लॉकडाऊनवर १ एप्रिलआधी निर्णय; परिस्थिती गंभीर तरी तूर्त निर्णय टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 12:25 IST

Corona Virus in Pune, no decision taken by Ajit Pawar: आरटीपीसीआर चाचण्याचे अहवाल येण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे.

पुण्यात लॉकडाऊन (Lockdown ) होणार की नाही यावर उप मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीत ठोस असा काहीच निर्णय होऊ शकला नाही. पुण्यात 1 एप्रिल ते 14 एप्रिल काळात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासन करत होते. मात्र, अजित पवारांसह आयएएस अधिकाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविल्याने १ एप्रिलआधी आणखी एक बैठक घेण्याचे ठरले आहे. यामुळे तुर्तास पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (No lockdown Decision taken in Pune till 1 april. )

आरटीपीसीआर चाचण्याचे अहवाल येण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.

आजच्या बैठकीत पुण्यात कडक लॉकडाऊन करावा अशी मागणी प्रशासनाने केली. मात्र, यास अजित पवारांनी विरोध दर्शविला. यापेक्षा निर्बंध अधिक कडक करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहून १ एप्रिलआधी आणखी एक आढावा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही यावर निर्णय घेण्याच येण्याची शक्यता आहे. 

परिस्थिती गंभीर, मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागणार आहे . पुण्यात आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेण्यात येणार असून 16 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेAjit Pawarअजित पवार