उरूळी कांचनच्या महिला सरपंचाचे भवितव्य ठरणार सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 14:30 IST2020-07-18T14:29:50+5:302020-07-18T14:30:39+5:30
सरपंचपदी निवड झाल्यापासून एक गट विद्यमान महिला सरपंचांच्या राजीनाम्याची प्रयत्नशील आहे.

उरूळी कांचनच्या महिला सरपंचाचे भवितव्य ठरणार सोमवारी
उरुळी कांचन: उरळीकांचनच्या महिलासरपंचावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. २० जुलै २०२०रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार डॉ. सुनील कोळी यांनी दिली.या बैठकीतच महिलासरपंचाचे भवितव्य ठरणार आहे.
उरुळी कांचन सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठरावाचा आठ जणांच्या सहीचा अर्ज १३ तारखेला आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी सोमवारी (दि.२० ) रोजी विशेष बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे राज्य शासन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या तयारीत असतानाच हा अविश्वास ठराव दाखल होणे ही बाब परिसरात चर्चेचा विषय झाली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे, सरपंचपदी निवड झाल्यापासुनच ग्रामपंचायत सदस्यामधील एक गट राजश्री वनारसे यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्नशील आहे. सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत एका महिला सदस्याचे सदस्यत्व सहा महिन्यांपूरवी रद्द झाल्याने सोळा सदस्य आहेत.