Pune: गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल सांगून तरुणाची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 9, 2023 15:04 IST2023-11-09T15:03:47+5:302023-11-09T15:04:00+5:30
पुणे : ट्रेडिंग वेबसाइटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळेल असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार कॅम्प परिसरात ...

Pune: गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल सांगून तरुणाची फसवणूक
पुणे : ट्रेडिंग वेबसाइटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळेल असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे. मोबाईल आणि ईमेलद्वारे संपर्क करून ही फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुखसार अख्तर शेख (वय- २९, रा. कॅम्प) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. सदर वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे त्यांना आमिष दाखवले. त्यांनतर फिर्यादी यांच्याकडील एकूण ८६ हजार ८०० रूपये पाठवण्यास सांगितले. मात्र गुंतवणूक केल्यावर त्याचा कोणताही परतावा दिला नाही आणि संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही म्हणून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात राजेश दास आणि नंदिनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.