विवाह करून फसवणूक करणाऱ्याला अटक
By Admin | Updated: May 12, 2017 05:25 IST2017-05-12T05:25:11+5:302017-05-12T05:25:11+5:30
पूर्वी विवाह झाल्याचे लपवून २४ वर्षीय तरुणीसोबत दुसरा विवाह करणाऱ्या, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्या तरुणीला सोबत राहण्यास

विवाह करून फसवणूक करणाऱ्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वी विवाह झाल्याचे लपवून २४ वर्षीय तरुणीसोबत दुसरा विवाह करणाऱ्या, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्या तरुणीला सोबत राहण्यास भाग पाडून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीला येरवडा ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याला १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.
सचिन शिवाजी धिवार (वय ४०, रा. वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१३ ते १० मे २०१७ या कालावधीत घडली.
पोलिसांनी धिवार याला अटक करून न्यायालयात हजर केले, त्या वेळी सचिन याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तसेच त्याच्याकडे असलेले पिस्तुल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरून न्यायालयाने सचिनला पोलीस कोठडी सुनावली.