डेक्कन क्वीन रविवारी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:32 IST2017-08-19T01:32:06+5:302017-08-19T01:32:24+5:30

डोंबिवली व कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ठाकुर्लीजवळ उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम दि. २० आॅगस्ट रोजी सकाळी ९.१५ ते १२.४५ या वेळेत केले जाणार आहे.

Deccan Queen will be closed on Sunday | डेक्कन क्वीन रविवारी बंद राहणार

डेक्कन क्वीन रविवारी बंद राहणार

पुणे : डोंबिवली व कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ठाकुर्लीजवळ उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम दि. २० आॅगस्ट रोजी सकाळी ९.१५ ते १२.४५ या वेळेत केले जाणार आहे. या वेळेत मध्य रेल्वेकडून साडेतीन तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनसह पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या काही वेळेसाठी ठिकठिकाणी थांबविल्या जाणार आहेत. परिणामी या गाड्यांना नियमित वेळेपेक्षा काही वेळ उशिराने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Deccan Queen will be closed on Sunday